MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा

Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा

Weather Update: महाराष्ट्रात हवामानात मोठी उलथापालथ होत आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील ७ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' दिलाय, तर कोकणात तीव्र उकाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 14 2026, 10:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा
Image Credit : Gemini AI

महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा

मुंबई: महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हात आता अवकाळी पावसाची भर पडणार असून, हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी राज्याचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. कोणत्या भागात छत्री सोबत ठेवावी लागेल आणि कुठे उन्हाचा चटका जाणवेल, जाणून घ्या 

26
१. या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (वादळी पावसाचा इशारा)
Image Credit : Getty

१. या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (वादळी पावसाचा इशारा)

पुढील २४ तासांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने खालील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे:

पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली आणि सोलापूर.

मराठवाडा: बीड आणि धाराशिव.

विदर्भ: चंद्रपूर आणि गडचिरोली. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Related image2
Maharashtra Gas Supply Rules: महाराष्ट्र गॅस संकट, कोणाला मिळणार 100% पुरवठा? सरकारने जारी केली नवी नियमावली!
36
२. कोकण आणि मुंबई, उकाड्याने अंगाची लाहीलाही
Image Credit : Getty

२. कोकण आणि मुंबई, उकाड्याने अंगाची लाहीलाही

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता नसली, तरी दमट हवामानामुळे नागरिक हैराण होतील. मुंबईत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक तीव्र भासेल. 

46
३. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, तापमानात वाढ
Image Credit : Getty

३. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, तापमानात वाढ

पुणे: पुण्यात हवामान कोरडे राहील, मात्र कमाल तापमान ३७ अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे.

नाशिक विभाग: नाशिक, जळगाव आणि धुळ्यात उन्हाचा चटका कायम असेल. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

56
४. विदर्भ: 'हीट वेव्ह' आणि पावसाचा दुहेरी खेळ
Image Credit : Getty

४. विदर्भ: 'हीट वेव्ह' आणि पावसाचा दुहेरी खेळ

विदर्भात विचित्र परिस्थिती पाहायला मिळणार आहे. अमरावती आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) यलो अलर्ट आहे, तर दुसरीकडे पूर्व विदर्भात पावसाची हजेरी लागणार आहे. 

66
शेतकऱ्यांसाठी टीप
Image Credit : Gemini

शेतकऱ्यांसाठी टीप

कापणीला आलेल्या पिकांची आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी मालाची साठवणूक करावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
कोल्हापूर बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
उद्धव ठाकरेंची हा मोठा नेता सोडणार साथ, कारण ऐकून व्हाल हैराण
Recommended image2
Solapur Crime : 'बाळू मामाचा अवतार’ म्हणवणारा भोंदू अटकेत; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Recommended image3
Maharashtra Weather Update : उन्हाचा कहर आणि पावसाची हजेरी! राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
Recommended image4
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : भाजपकडून 30 नावांची यादी दिल्लीकडे; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
Recommended image5
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 12 मे ला मतदान; महायुतीचे 8 जागांवर वर्चस्व, मविआसमोर मोठे आव्हान
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Recommended image2
Maharashtra Gas Supply Rules: महाराष्ट्र गॅस संकट, कोणाला मिळणार 100% पुरवठा? सरकारने जारी केली नवी नियमावली!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved