- Home
- Maharashtra
- ST महामंडळाचं दिवाळी गिफ्ट! ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
ST महामंडळाचं दिवाळी गिफ्ट! ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
दिवाळीपूर्वी, एसटी महामंडळाने प्रवाशांना एक खास भेट दिली. 'आवडेल तेथे प्रवास' या योजनेतील पासच्या दरांमध्ये मोठी कपात केली, ज्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात अमर्यादित एसटी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

ST महामंडळाचं प्रवाशांसाठी दिवाळी गिफ्ट!
मुंबई: दिवाळीपूर्वी राज्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने आपल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पास दरांमध्ये मोठी कपात करत प्रवाशांना दिवाळीचे खास गिफ्ट दिले आहे. त्यामुळे या सुट्टीच्या काळात पर्यटनाची मजा आता अधिक स्वस्तात घेता येणार आहे.
काय आहे ही योजना?
एसटी महामंडळाची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना ही एक खास सुविधा असून, यामध्ये प्रवाशांना निवडक कालावधीसाठी अमर्यादित एसटी प्रवास करता येतो. यात साधी बससेवा, जलद, रातराणी, शिवशाही, ई-शिवाई आणि शिवनेरी यांचा समावेश आहे. चार दिवस आणि सात दिवसांचे पास प्रौढ आणि मुलांसाठी वेगवेगळ्या दरात उपलब्ध आहेत.
नवीन दरांमध्ये किती बचत?
राज्यातील अलीकडील पूरपरिस्थितीचा विचार करून एसटी महामंडळाने यंदा दिवाळीच्या हंगामी भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे जुन्या दरांशी तुलना करता प्रवाशांना 225 ते 1250 रुपयांपर्यंत थेट बचत होणार आहे.
जुने आणि नवीन दर (प्रमुख सेवांसाठी)
साधी, जलद, रातराणी सेवा (आंतरराज्यसह)
प्रकार जुने दर नवीन दर
चार दिवस (प्रौढ) ₹1814 ₹1364
चार दिवस (मुले) ₹910 ₹685
सात दिवस (प्रौढ) ₹3171 ₹2382
सात दिवस (मुले) ₹1588 ₹1194
शिवशाही आसनी सेवा
प्रकार जुने दर नवीन दर
चार दिवस (प्रौढ) ₹2533 ₹1818
चार दिवस (मुले) ₹1261 ₹911
सात दिवस (प्रौढ) ₹4429 ₹3175
सात दिवस (मुले) ₹2217 ₹1590
12 मीटर ई-बस (ई-शिवाई)
प्रकार जुने दर नवीन दर
चार दिवस (प्रौढ) ₹2861 ₹2072
चार दिवस (मुले) ₹1438 ₹1038
सात दिवस (प्रौढ) ₹5003 ₹3619
सात दिवस (मुले) ₹2504 ₹1812
पर्यटनाची संधी, तीही कमी खर्चात!
दिवाळीच्या सुट्यांमध्ये बहुतांश नागरिक पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रं आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात. ही योजना त्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एकदाच पास घ्या आणि हवे तितके प्रवास करा तोही स्वस्तात!