MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!

Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!

Ration Card: अनेक नागरिकांची रेशन कार्डमधून नावे अचानक कमी होत आहेत. यामागे ई-केवायसी न करणे किंवा आधार लिंक नसणे अशी कारणे असू शकतात. तुमचे नाव यादीत आहे की नाही हे ऑनलाइन कसे तपासावे आणि नाव वगळल्यास पुन्हा कसे जोडावे, याची माहिती दिली आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 05 2026, 07:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेशन कार्डमधून नाव गायब झालंय?
Image Credit : social media

रेशन कार्डमधून नाव गायब झालंय?

मुंबई : सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी 'रेशन कार्ड' हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. मग ते स्वस्त धान्य असो, मोफत रेशन असो किंवा गॅस सबसिडी. मात्र, सध्या अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की त्यांचं नाव रेशन कार्डमधून अचानक कमी झालं आहे. तांत्रिक चुका किंवा ई-केवायसी न केल्यामुळे तुमचंही नाव कट झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 

25
नाव नेमकं का कट होतं? (महत्त्वाची कारणे)
Image Credit : our own

नाव नेमकं का कट होतं? (महत्त्वाची कारणे)

तुमच्या रेशन कार्डमधून नाव कमी होण्याची काही प्रमुख कारणे असू शकतात.

आधार लिंकिंग: रेशन कार्ड आधारशी लिंक नसणे किंवा ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न होणे.

डुप्लिकेट नोंदणी: एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या रेशन कार्डवर असणे.

माहिती अद्ययावत नसणे: कुटुंबातील सदस्यांचे लग्न, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यानंतर माहिती अपडेट न करणे.

तांत्रिक बिघाड: डेटा एंट्री करताना झालेली मानवी चूक किंवा सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी. 

Related Articles

Related image1
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Related image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
35
तुमचे नाव यादीत आहे की नाही? 'असं' तपासा ऑनलाइन
Image Credit : our own

तुमचे नाव यादीत आहे की नाही? 'असं' तपासा ऑनलाइन

नाव तपासण्यासाठी तुम्हाला आता रेशन ऑफिसच्या चकरा मारण्याची गरज नाही. खालील स्टेप्स फॉलो करा.

१. सर्वप्रथम nfsa.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. तिथे 'Ration Card Details On State Portals' हा पर्याय निवडा.

३. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव/पंचायत निवडा.

४. तुमच्या भागातील रेशन दुकानदाराचे नाव आणि रेशन कार्डचा प्रकार निवडा.

५. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल, त्यात तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. 

45
नाव वगळले असल्यास पुन्हा नोंदणी कशी करावी?
Image Credit : our own

नाव वगळले असल्यास पुन्हा नोंदणी कशी करावी?

जर यादीत तुमचे नाव नसेल, तर घाबरू नका. तुम्ही पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पोर्टलवर जा.

तिथे 'नाव जोडणे' (Add Member) किंवा 'दुरुस्ती अर्ज' हा पर्याय निवडा.

आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा इ.) स्कॅन करून अपलोड करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर, सरकारी पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे नाव पुन्हा रेशन कार्डमध्ये दिसेल.

55
महत्त्वाची टीप
Image Credit : our own

महत्त्वाची टीप

सरकारी लाभ निरंतर मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड 'आधार'शी लिंक असल्याची खात्री आजच करून घ्या!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं! ST च्या ४५० जादा गाड्या धावणार; पाहा तुमचे रूट!
Recommended image2
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात SIT स्थापन; महिला आयपीएस तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे
Recommended image3
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image4
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू, लेह-लडाख ट्रिपवरून परतताना दुर्घटना
Recommended image5
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : चिंचवडमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; चापेकर चौक परिसरात रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Related Stories
Recommended image1
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Recommended image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved