पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका २२ वर्षीय तरुणीनं डिलिव्हरी बॉयवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासात हा डिलिव्हरी बॉय तरुणीचा प्रियकर असल्याचे उघड झाले आहे.
बलात्कार आणि विनयभंगाच्या केसेस दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीतील एका २२ वर्षीय तरुणीनं डिलिव्हरी बॉयला लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे पुणे शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली होती.
डिलिव्हरी बॉय निघाला तरुणीचा मित्र
डिलिव्हरी बॉय असणारा हा मुलगा तरुणीचा मित्र निघाला आहे. तरुणीनं तक्रारीत म्हटलं होतं की, "एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फवारला. त्यानंतर बलात्कार केला आणि सेल्फी काढत त्याखाली "मी पुन्हा येईन" असा मेसेज लिहिला" असा दावा तरुणीनं केला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती निर्माण झाली.
पोलिसांना तपासात एक नवीन माहितीचा उलगडा झाला आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला हा मुलगा दुसरा तिसरा कोण नसून त्या मुलीचाच प्रियकर असल्याचं सांगितलं आहे. दीड वर्षांपासून संबंध असलेला त्या मुलीचा प्रियकर होता आणि याची माहिती त्या दोघांच्या घरच्यांना होती. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीसोबत तिचा भाऊ राहत होता पण घटना घडलेल्या दिवशी तो बाहेर गेला होता. मुलीसोबत मित्राने आल्यावर अर्धवट लैंगिक संबंध ठेवले होते. मुलीने खोटी तक्रार दाखल केली असेल तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.