सार

Shiv Sena Foundation Day 2024 : शिवसेना पक्षाची स्थापना 19 जून 1966 ला मुंबईतील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. परंपरेनुसार, यंदाही शिवसेनेच्या स्थापना दिनाचा सोहळा ष्णमुखानंद हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे.

Shiv Sena Foundation Day : शिवनेसेकडून आज (19 जून) आपला 58वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून राजकीय कार्यक्रम जोरदार साजरा केला जाणार आहे. शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देण्यासह विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता आहे. मुंबईतील ष्णमुखानंतर हॉलमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या गटातून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधितही करतील.

बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट
ष्णमुखानंदमधील सोहळ्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत दादरमधील महापौर बंगल्यात शिवसेनेच्या संस्थापक स्मारकाला भेट दिली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, पुढील वर्षी 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मारकाचे उद्घाटन केले जाईल.

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले की, "शिवसेनेचा आज स्थापना दिवस आहे. आम्ही स्थापना दिवस जोरदार साजरा करणार आहोत. एकच वाईट गोष्ट अशी की, आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले गेलेय. तरीही आम्ही लोकसभा निवडणुकीत 9 जागांवर विजय मिळवलाय."

शिंगे गटाकडूनही स्थापना दिनानिमित्त जोरदार तयारी
खरी शिवसेना म्हणून ओखळल्या जाणाऱ्या शिंदे गटाकडूनही पक्षाच्या स्थापना दिनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (19 जून) संध्याकाळी 5 वाजता नेता आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी म्हटले की, आम्ही सदस्यता अभियान, मतदार रजिस्ट्रेशन अभियानाची सुरुवात करणार आहोत. याशिवाय शिंदे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याने पक्षाची पुढील रुपरेषा ठरवणार आहोत.

शिंदे गटाकडून शिवसेना स्थापना दिनाचा सोहळा गेल्या वर्षी गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण कार्यक्रमास्थळी काही असुविधांमुळे यंदा सोहळा वरळीतील एनएससीआय डोममध्ये होणार आहे.

शिवसेना पक्षाची स्थापना
मुंबईत 19 जूनला 1966 रोजी उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. वर्ष 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्याने पक्ष दोन गटात विभागला गेला. शिवसेना पक्षाकडून नेहमीच मराठी माणसांच्या दृष्टीने विचार करण्यात आला आहे. याशिवाय पक्षाची मुख्य विचारसणीच हिंदुत्ववादी राहिली आहे.

आणखी वाचा : 

निवडणुकीतील पराभवानंतरही उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती, काँग्रेसने घेतला आक्षेप

Sharad Pawar at Baramati Visit : विधानसभेसाठी शरद पवार यांनी कंबर कसली, 3 दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार