महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना झालेल्या दुर्घटनांचे वृत्तांत या लेखात देण्यात आले आहेत. ट्रेकिंग करताना योग्य तयारी, मार्गदर्शन आणि सुरक्षा उपायांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध सिद्धगड किल्ल्यावर साईराज चव्हाण (वय 22) यांचा अपघात झाला. ते 13 सदस्यांच्या ग्रुपचा मॉन्सूनमधील ट्रेक करायला आले होते. मधल्या काळात दाट धुकं आणि पावसामुळे पथदर्शक मार्ग न कळल्यामुळे हि घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. साईराज हे ट्रेक करताना पाय घसरून सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला .

पोलिसांनी आणि महाराष्ट्र माउंटिनियरिंग रेस्क्यू टीमने अपघातानंतर शोध मोहीम सुरू केली. मात्र, धुकं आणि पावसामुळे ऑपरेशन्स पुढे ढकललं जात होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी, जवळपास दरीमध्ये साईराजचा मृतदेह सापडला. रेस्क्यूकर्त्यांनी कडक परिश्रमाने रॅपेलिंगद्वारे त्याची बॉडी काढली. ट्रेक मार्गदर्शनाचा अभाव, प्रशिक्षित गाईड सोबत नसणे आणि अवघड ठिकाणी ट्रेक केल्यामुळे यामुळे हा अपघात झाला.

हडसर किल्यावर अपघात होऊन एका व्यक्तीचा झाला होता मृत्यू

पुणे जिल्ह्यातील हडसर किल्ल्यावर २० फेब्रुवारी २०२० रोजी घडलेल्या दुर्घटनेत सिद्धी कमटे (वय 20) नावाच्या मुंबईतील तरुणीचा अपघात झाला. 35 सदस्यांच्या ट्रेक ग्रुपने राजा शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ल्यावर स्वच्छता मोहीम केली. सकाळी १० वाजता पावसाळ्यात चढाई करत असताना तिचा पाय घसरला आणि ती सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक लोकांनी तिला रुग्णालयात पोहचवून उपचार सुरू केले, मात्र तिथे मृत घोषित करण्यात आले .

माळशेज घाटात घडली होती अशी घटना

मार्च २०२३ मध्ये नाशिकचा किरण काळे (वय 52) या ‘Gipsy’ नावाच्या ट्रेकर्स ग्रुपचा सदस्य माळशेज घाटाजवळ गणपती घाट येथे 200 फूट खाली घसरून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 2 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांना ताबोडतोब कळवण्यात आले पण बॉडी हाती लागेपर्यंत किरणांचा मृत्यू झाला होता. किरण हे नियमित ट्रेकर्स होते, त्यांनी योग्य तयारी केली होती, तरीही मॉन्सून आणि पत्ता न कळल्यामुळे अपघात झाला होता.

राजगड किल्यावर जलाशयात पडून मृत्यू 

ऑगस्ट २०२३ मध्ये अजय कलमपारा (वय 33) हा युवक राजगड किल्ल्यावर ट्रेक करताना पाणी घेण्यासाठी टाकीजवळ गेला आणि त्यातच पडून मृत झाला. सकाळी सव्वा ४ वाजता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मित्रांनी त्याची बूट, विहिरीजवळील टॉर्च सापडल्यावर शोध मोहीम सुरू केली. शेवटी त्याची बॉडी पोलिसांच्या हाती लागली होती.

ट्रेकिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

ट्रेकिंग म्हणजे फक्त साहस नव्हे, तर निसर्गाशी जवळीक साधण्याचा एक मार्ग आहे. मात्र, यामागे एक मोठी जबाबदारी आणि दक्षता घेणे गरजेचं असते. सध्या पावसाचा काळ सुरू असल्यामुळे रस्ते निसरडे होतात, दाट धुके दृष्टीस पडत नाही त्यामुळं डोंगरांवरील माती सटकून खाली उरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ट्रेकवर जाताना हवामानाचा अंदाज, मार्गाची माहिती, योग्य गाईडची साथ आणि वैयक्तिक सुरक्षेची तयारी आवश्यक आहे.

ट्रेकसाठी निघण्याआधी ग्रुपमधील प्रत्येकाची शारीरिक क्षमता लक्षात घ्यावी, किमान एक ‘फर्स्ट एड किट’ आणि आपत्कालीन संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क आहे का आणि जीपीएस ट्रॅकर बरोबर असावा. हेल्मेट, योग्य शूज, रेनकोट आणि पाण्याचा स्टॉक जवळ असणे . जेथे शक्य आहे तिथे स्थानिक प्रशासन, वनविभाग किंवा ट्रेकिंग क्लबकडून अधिकृत परवानगी घेऊनच ट्रेकिंग करावे.

प्रत्येक ट्रेकरने लक्षात ठेवायला हवे की, ट्रेकिंग ही स्वतःची परीक्षा आहे – आत्मविश्वास वाढवणारी, पण अवघड ठिकाणी शक्यतो ट्रेकिंग करू नये. त्यामुळे योग्य नियोजन, शिस्त, आणि निसर्गाबद्दलचा आदर हीच सुरक्षित ट्रेकिंगची खरी गुरुकिल्ली आहे. एक चूक अनेकांचे आयुष्य संपवून टाकू शकते हे कायम लक्षात ठेवावं.