सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर १४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1. कांदा निर्यात शुल्क कपात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात शुल्क कपातीचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागत केले आहे.

2. आंतरवाली सराटीत लाठीमार केल्यानंतर मनोज जरांगे निघून गेला, आमदार रोहित पवार, राजेश टोपेंनी परत आणून बसवलं, छगन भुजबळ यांनी सनसनाटी दावा केला आहे. तर छगन भुजबळ यांना वेड लागले आहे. मनोज जरांगे यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.

3. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावे, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यातील आढावा घेतला आहे.

4. एकनाथ खडसे हे गणपतीनंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

5. भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन, कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

6. आनंद आश्रमात नोटा उधळल्या असून शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ट्विट करून यावर टीका केली आहे. 

7. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे संभाव्य २५ उमेदवार ठरले असल्याचा सूत्रांकडून दावा करण्यात आला आहे. 

8. शिवसेनेची २५ उमेदवारांची यादी फायनल झाली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाव जाहीर करतील अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.