Jagbudi River Flood : मुसळधार पावसाने जगबुडी नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट, नागरिकांना खबदारी घेण्याचे आवाहन

| Published : Jun 22 2024, 11:45 AM IST / Updated: Jun 22 2024, 11:51 AM IST

Jagbudi River Flood
Jagbudi River Flood : मुसळधार पावसाने जगबुडी नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट, नागरिकांना खबदारी घेण्याचे आवाहन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Jagbudi River Flood : खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदी सध्या इशारा पातळीच्यावर वाहत आहे.

 

Jagbudi River Flood : रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदी सध्या इशारा पातळीच्यावर वाहत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रशासनचे आवाहन

सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरु नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शहरात सखल भागात पाणी साचले असून शिवतर मार्गावर अरुंद गटारांमुळे पाणी रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

पावसाचा जोर वाढल्यास नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा : 

मुलींना मोफत शिक्षण घोषणेची अंमलबजावणी करा, फौजिया खान यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करत राज्यभर आंदोलन करण्याचा दिला इशारा