पावसाळ्याच्या दिवसाचे पोषक वातावरण असल्यामुळं कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पावसाळ्याच्या दिवसाचे पोषक वातावरण असल्यामुळं कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज ६ जुलै रोजी पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढत चालला आहे. येथील घाटमाथ्यावर आता जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील २४ तासात पुण्याच्या शिवाजीनगर भागात ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमान 272 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला वाढला आहे. पाऊस संततधार पडत असल्यामुळं नद्यांच्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी कमाल तापमान 27.1 अंश सेल्सिअस एवढे होते. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर स्थिर राहिल. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार असून त्यामुळं नागरिकांनी खबरदारी बाळगणं गरजेच आहे.
घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट वर्तवला
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. येथे ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर येथे ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर राहणार आहे.
