राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

| Published : Dec 08 2024, 03:02 PM IST / Updated: Dec 08 2024, 03:23 PM IST

Rahul Narvekar
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते.

औपचारीक घोषणा बाकी

मात्र, महाविकास आघाडीकडून कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे नार्वेकर बिनविरोध निवडूण येण्याची शक्यता आहे. उद्या ९ डिसेंबर रोजी राहूल नार्वेकर यांच्या निवडीची औपचारीक घोषणा बाकी आहे.

 

 

महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ

रविवारी नव्याने स्थापन झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख, शिवसेनेचे (उ.बा.ठा.) आदित्य ठाकरे यांच्यासह काही आमदारांनी आज सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच शपथ घेतली.

आणखी वाचा-

मंत्रिमंडळ विस्ताराला होणार विलंब? नावांची निवड, चर्चा आणि दिल्लीची मंजुरी बाकी!