सार

Success Story: आयुष्यात पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवणारे लोक फार कमीच असतात. आयुष्यात कलेची जोड असली की व्यक्ती त्या जोरावर व्यवसाय यशस्वीपणे करू शकतो. महाराष्ट्रातील तरूणाने देखील आपली कला जपत त्याचे व्यवसायात रूपांतर केले.

Maharashtra Success Story : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले सावर्णे हे एक आदिवासी समाजबहुल (Tribal community) गाव आहे. ठाणे शहरापासून जवळपास 115 किलोमीटर अंतरावर सावर्णे गाव (Savarne Village) वसलंय. सावर्णे गावातील आदिवासी तरूणाने आपली कला जपत त्याचे व्यवसायात रूपांतर केले. राजेश अनंत भला असे या तरूणाचे नाव. राजेशने नोकरीऐवजी कलेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे ठरवले.

त्याने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पण त्याला मनाप्रमाणे काम मिळत नव्हते. यादरम्यान तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. घरातली कामं पूर्ण तो आपल्या कुटुंबीयांसोबत आजूबाजूच्या गावामध्ये रोजगारासाठी भटकंती करायचा.

कलेने केले आर्थिकदृष्ट्या सक्षम

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी व रोजगार मिळवण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे राजेशने मनाशी पक्क केले. व्यवसाय करायचा झाल्यास हातात पुरेसे भांडवल लागणार होते. हा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी त्याने घरातच कमी भांडवलापासून केशकर्तनालायाचा व्यवसाय (Hair Cut Business) सुरू केला. तुमच्या आमच्या भाषेत सांगायचे झालं तर स्वतःचा सलॉनाचा बिझनेस सुरू केला.

या कामासाठी लागणाऱ्या वस्तूही खरेदी केल्या. राजेशच्या या केशकर्तनालयाच्या व्यवसायाला दिवगासणिक यश मिळत गेले व कमाईही वाढली.

बिझनेस वाढवण्याचा निर्णय

यानंतर राजेशनं मोठ्या शहरात व्यवसाय करण्याचे ठरवलं. भांडवलासाठी एका मित्राने आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेतून(Nucleus Budget Yojana) 100 टक्के अनुदानावर मिळणाऱ्या अर्थसहाय्य योजनेची माहिती त्याला दिली. मित्राच्या मार्गदर्शनानुसार राजेशने या योजनेचा लाभ घेतला.

शासकीय योजनेमुळे मिळाला हातभार

अर्थसहाय्य योजनेच्या लाभातून मिळालेल्या भांडवलाच्या मदतीने राजेशनचे कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोरोशी नाका येथे भाडे तत्त्वावर एक गाळा खरेदी करून व्यवसाय सुरू केला. आपल्या कलेलाच जोपासून तिला मोठे करून या तरुणाने जीवनातील आर्थिक संकटे दूर केली. महत्त्वाचे म्हणजे हे स्वप्न करण्यासाठी त्याला शासकीय योजनांमुळे बरीच मदत मिळाली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे(Ekatmik Adiwasi Vikas Prakalp) केंद्रवर्ती अर्थसंकल्प म्हणजेच न्युक्लिअस बजेट अंतर्गत अनुदानातून आदिवासी व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नतीकडे नेणारी अशी ही योजना आहे. राजेश भला याच्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांसाठी ही योजना व्यवसायासाठी वरदान ठरत आहे.

Content/Photo Credit : महासंवाद वेबसाइट

आणखी वाचा

शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग