MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Rain Alert: विदर्भावर अवकाळीचे सावट! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Rain Alert: विदर्भावर अवकाळीचे सावट! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Rain Alert: हवामान खात्याने विदर्भात पुढील ३ तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 23 2026, 09:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
विदर्भावर अवकाळीचे सावट! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे
Image Credit : Gemini AI

विदर्भावर अवकाळीचे सावट! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे

नागपूर : विदर्भात सध्या उन्हाचा चटका वाढला असतानाच निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. थंडी ओसरल्यानंतर आता 'अवकाळी'चा फेरा परतला असून, हवामान खात्याने पुढील ३ तास विदर्भासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भवासियांना आता विजांचा कडकडाट आणि पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

25
विदर्भातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
Image Credit : Social Media

विदर्भातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील खालील जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल.

चंद्रपूर आणि गडचिरोली: या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

यवतमाळ: या जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या तिन्ही जिल्ह्यांसाठी प्रशासनाने 'यलो अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. 

Related Articles

Related image1
CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काचं घर! सिडको लॉटरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Related image2
SSC बोर्डाचा पेपर की चौथीची चाचणी? दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिकेतील 'अतिसोप्या' प्रश्नांमुळे शिक्षणतज्ज्ञ संतापले!
35
पावसाचे पुनरागमन का झाले?
Image Credit : Meta Ai

पावसाचे पुनरागमन का झाले?

राज्यात अचानक निर्माण झालेल्या या वातावरणामागे दोन मुख्य कारणे आहेत.

१. कमी दाबाचा पट्टा: बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

२. बाष्पयुक्त वारे: समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच मराठवाड्यातील बीड आणि परभणीनंतर आता विदर्भाकडे पावसाचा प्रवास सुरू झाला आहे.

45
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Image Credit : social media

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

काढणीला आलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा.

विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नये.

पाळीव प्राण्यांना सुरक्षित निवार्यात बांधावे.

55
हवामान अपडेट
Image Credit : social media

हवामान अपडेट

विदर्भासोबतच मराठवाड्यातील काही भागांतही ढगाळ वातावरण राहणार असून, उन्हाचा चटका आणि पावसाचा लपंडाव येत्या काही दिवसांत पाहायला मिळू शकतो.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Baramati Rahuri Assembly Bypoll Election: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा! बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; 'या' दिवशी होणार मतदान!
Recommended image2
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!
Recommended image3
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका; नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत
Recommended image4
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा
Recommended image5
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Related Stories
Recommended image1
CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काचं घर! सिडको लॉटरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Recommended image2
SSC बोर्डाचा पेपर की चौथीची चाचणी? दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिकेतील 'अतिसोप्या' प्रश्नांमुळे शिक्षणतज्ज्ञ संतापले!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved