पुण्यात पबकडून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी निमंत्रणासोबत पाठवले कंडोम

| Published : Dec 31 2024, 09:11 AM IST

condoms
पुण्यात पबकडून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी निमंत्रणासोबत पाठवले कंडोम
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुण्यातील एका पबकडून नववर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीसाठी निमंत्रण पाठवत त्यासोबत कंडोम आणि ORS पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे वाद निर्माण होत राजकीय पक्षांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Pune : पुण्यात नव्या वर्षाच्या पूर्वासंध्येला आयोजिक करण्यात आलेल्या लोकांना कंडोम आणि ओआरएस (ओरल रिहाइड्रेशन सॉल्शून) वाटण्यात आले. यामुळे पार्टीचे निमंत्रण मिळालेल्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या प्रकरणावरुन सध्या वाद निर्माण झाला असून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हाय स्पिरिट्स पबने 31 डिसेंबरला आयोजित केलेल्या पार्टीसाठी निमंत्रणासोबत कंडोम आणि ओआरएस पाठवण्यात आले होते.

पबने कंडोम आणि ओआरएस पाठवल्याच्या प्रकारावरुन राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसने पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पबच्या विरोधात तक्रार केली आहे. युवा काँग्रेस सदस्य अक्षय जैन यांनी म्हटले की, "आम्ही पब आणि नाइटलाइफच्या विरोधात नाही. पण तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंडोम आणि ओआरएस वाटण्याची मार्केटिंग स्ट्रेटेजी पुण्याच्या परंपरेच्या विरोधात आहे. आम्ही पोलिसांकडे पबच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पबच्या अशाप्रकारामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश पसरवला जातो. यामुळे काही अन्य घटनाही घडू शकतात."

पब मालकाचे स्पष्टीकरण

तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पब मालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे. पब मालकाने म्हटले की, कंडोमचे वाटप करणे गुन्हा नाही. पबने दावा करत म्हटले, तरुणांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कंडोम वाटले.

या प्रकारावर पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, "महाराष्ट्र युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकाने कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस धाडली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आयोजकांनी नववर्षाच्या सेलिब्रेशनवेळी घेतल्या जाणाऱ्या सुक्षिततेसंदर्भातील माहिती आमच्यासोबत शेअर केली आहे. सध्या प्रकरणाचा अधिक तपास केला आहे. आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही."

आणखी वाचा : 

New Year 2025 साजरे करण्यासाठी जाणून घ्या मुंबई, पुण्यातील टॉप डेस्टिनेशन्स!

Maharashtra bank Holiday list 2025: महाराष्ट्रातील बँक सुट्ट्यांची यादी