बदलापूर अत्याचार: शरद पवारांच्या नेतृत्वात पुण्यात निषेध, राज्यभर संतापाची लाट

| Published : Aug 24 2024, 11:31 AM IST / Updated: Aug 24 2024, 11:33 AM IST

sharad pawar
बदलापूर अत्याचार: शरद पवारांच्या नेतृत्वात पुण्यात निषेध, राज्यभर संतापाची लाट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन सुरू आहे. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली असून, राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.

पुणे: बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केलीय. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे. पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन होत आहे.आंदोलनाच्या स्थळी शरद पवार पोहोचले असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. नंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

बदलापूर अत्याचार प्रकरण नेमकं काय आहे?

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचार: मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार, समितीचा धक्कादायक निष्कर्ष

नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार, मुसक्या आवळल्या