सार
Lonavala Bhusi Dam: धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथं शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
पुणे : वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे मात्र, त्याचा शोध लागला नाही.
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं.अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होता. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब आले मात्र, पाण्याला वेग असल्याने वाहून गेले. ऐकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथं पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो
पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
आणखी वाचा :