सार

हवामान खात्याने रविवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्यावतीने मनाई करण्यात आली आहे.

 

Maharashtra Rain Update : मुंबई आणि मुंबई उपनगरात सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने काहिशी उसंत घेतली आहे. तर मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्यावतीने मनाई करण्यात आली आहे. आज मुंबई शहरात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. यासह मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याने यल्लो अलर्ट जारी केला आहे.

आणखी वाचा

Radhakrishna Vikhe Patil : 'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास