Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. पोलिस आयुक्तांनी मिरवणुकीचे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर केले असून, शांतता आणि सुरक्षिततेसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे.
पुणे : पुणेकरांसाठी गणेश विसर्जन हा एक सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा असतो. 6 सप्टेंबर 2025, शनिवार या दिवशी पुण्यातील पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक ठरावीक वेळापत्रक आणि मार्गानुसार पार पडणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, विसर्जन शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात व्हावे यासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे.
मिरवणुकीचा मार्ग व वेळापत्रक
पहिला मानाचा गणपती – कसबा गणपती
सकाळी 9:15 वाजता टिळक पुतळा, मंडई येथे आगमन
सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीची सुरुवात
10:15 वाजता लक्ष्मी रोडकडे प्रस्थान
दुसरा मानाचा गणपती – तांबडी जोगेश्वरी
10:30 वाजता बेलबाग चौकातून मार्गस्थ
इतर मानाचे गणपती – सहावा व सातवा मान
महापालिका व त्वेष्ट कासार गणपती मिरवणुकीत दुपारी 1:00 वाजता सहभागी
प्रमुख गणेश मंडळे व वेळा
लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरील मंडळे – दुपारी 3:45 पासून
श्रीमंत दगडूशेठ गणपती – दुपारी 4:00
जिलब्या मारुती व अखिल मंडई गणपती – संध्याकाळी 5:30 नंतर
बेलबाग चौक हा मिरवणुकीतील मुख्य बिंदू असून, संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत तो रिकामा करण्याचे आदेश आहेत.
मिरवणुकीसाठी नियमावली काय सांगते?
सर्व मंडळांनी ठरवलेल्या मार्गानेच मिरवणुकीत सहभागी व्हावे लागेल.
लक्ष्मी रोडवरील मंडळे केवळ बेलबाग चौकातूनच प्रवेश करू शकतील.
कसबा गणपतीच्या पुढे कोणतेही मंडळ जाऊ शकणार नाही.
प्रत्येक मंडळाने मिरवणुकीत आवश्यक अंतर राखणे अनिवार्य आहे.
वाद्यांविषयी नियम
टिळक पुतळा ते बेलबाग चौक दरम्यान ढोल-ताशा व डीजे वाजवण्यास बंदी
फक्त बेलबाग चौकानंतर वाद्यांना परवानगी
एका मंडळाला फक्त डीजे किंवा ढोल-ताशा गट यापैकी एकच पर्याय
प्रत्येक गटात फक्त 60 सदस्य, जास्तीत जास्त 2 गटांना परवानगी
विसर्जनानंतर ढोल-ताशा गटांनी परतीचा मार्ग अलका टॉकीजकडून घेऊ नये
महत्त्वाच्या सूचना
बेलबाग चौकात प्राधान्यक्रम: परिशिष्ट 1, 2, 3 मधील मंडळांना
इतर मंडळांना “पहिले येणाऱ्यास प्रथम संधी” या तत्त्वावर मिरवणुकीत प्रवेश
टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी 10:30 नंतरच सुरु होऊ शकतात
पोलीस प्रशासनाकडून आवाहन
शहरातील सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी प्रशासनाने ठरवलेल्या वेळापत्रक व नियमांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून मिरवणूक जल्लोषात आणि सुरक्षिततेने पार पडेल.


