MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • बळीराजाच्या चिंतेत वाढ! २०२६ मध्ये पुन्हा येणार 'एल निनो'; मान्सूनवर मोठं संकट, पाहा काय म्हणतोय स्कायमेटचा अहवाल?

बळीराजाच्या चिंतेत वाढ! २०२६ मध्ये पुन्हा येणार 'एल निनो'; मान्सूनवर मोठं संकट, पाहा काय म्हणतोय स्कायमेटचा अहवाल?

maharashtra drought warning: खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'च्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये 'एल निनो' पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 19 2026, 08:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बळीराजाच्या चिंतेत वाढ! २०२६ मध्ये पुन्हा येणार 'एल निनो'
Image Credit : Getty

बळीराजाच्या चिंतेत वाढ! २०२६ मध्ये पुन्हा येणार 'एल निनो'

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर येत आहे. 'ला निना'चा प्रभाव ओसरू लागला असून आता पुन्हा एकदा 'एल निनो' (El Nino) सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी हवामान संस्था 'स्कायमेट' (Skymet) च्या ताज्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये एल निनो पुन्हा डोकं वर काढणार असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नेमकं काय घडतंय प्रशांत महासागरात?
Image Credit : our own

नेमकं काय घडतंय प्रशांत महासागरात?

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याची पातळी तापू लागली असून एल निनोची लक्षणे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांच्या मते

सक्रियता: २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रभाव अधिक तीव्र होईल.

कालावधी: जून ते सप्टेंबर दरम्यान, जेव्हा भारताला पावसाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच एल निनो शिखरावर असेल.

परिणाम: यामुळे केवळ भारतच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

Related Articles

Related image1
पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पण नागपूरकरांचा खोळंबा?
Related image2
Gudi Padwa 2026:जेव्हा महिलांनी हाती घेतले ढोल-ताशे आणि तलवार, पाहा शोभायात्रेचा
35
मान्सूनवर 'अस्मानी' संकट?
Image Credit : our own

मान्सूनवर 'अस्मानी' संकट?

भारतातील शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. स्कायमेटच्या मते, एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्येही एल निनोमुळे पावसाने ओढ दिली होती, ज्याचा मोठा फटका खरिपाच्या पिकांना बसला होता. 

45
'ला निना' निरोप घेणार, 'पॅसिफिक फ्लिप' होणार!
Image Credit : pixabay

'ला निना' निरोप घेणार, 'पॅसिफिक फ्लिप' होणार!

सध्या 'ला निना'मुळे हवामान काहीसे अनुकूल असले तरी, वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे चित्र बदलणार आहे. उन्हाळ्यात हवामान 'तटस्थ' स्थितीत जाईल आणि त्यानंतर होणाऱ्या 'पॅसिफिक फ्लिप' मुळे एल निनोची एन्ट्री होईल. हा बदल जागतिक हवामान पद्धतीत मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो. 

55
अन्नधान्य महागणार?
Image Credit : our own

अन्नधान्य महागणार?

२०२३-२४ मध्ये एल निनोचा प्रभाव ११ महिने टिकला होता, ज्यामुळे ते वर्ष विक्रमी उष्ण ठरले. त्याचा थेट परिणाम तांदूळ, डाळी आणि साखरेच्या उत्पादनावर झाला होता. जर २०२६ मध्येही हीच परिस्थिती राहिली, तर शेती उत्पादनात घट होऊन पुन्हा एकदा अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
अजित पवार गटाच्या नेत्याचा मागितला राजीनामा, नेमकं पक्षात काय घडलं?
Recommended image2
पुढील ९ दिवस धोक्याचे, या काळात नेमकं काय होणार?
Recommended image3
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image4
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image5
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Related Stories
Recommended image1
पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पण नागपूरकरांचा खोळंबा?
Recommended image2
Gudi Padwa 2026:जेव्हा महिलांनी हाती घेतले ढोल-ताशे आणि तलवार, पाहा शोभायात्रेचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved