MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पण नागपूरकरांचा खोळंबा?

पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पण नागपूरकरांचा खोळंबा?

Mumbai-Pune bullet train project: महाराष्ट्रात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन नवीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार असून, प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 19 2026, 06:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणे मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस
Image Credit : x

पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेननंतर राज्यात आणखी दोन हाय-स्पीड बुलेट ट्रेन्स धावणार आहेत. या क्रांतीकारी निर्णयामुळे मुंबई आणि पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली असून, मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या मार्गांना 'टॉप प्रायोरिटी' देण्यात आली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवास ३ तासांवरून थेट ४८ मिनिटांवर!
Image Credit : Gemini AI

प्रवास ३ तासांवरून थेट ४८ मिनिटांवर!

सध्या मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी ट्रेन किंवा रस्तेमार्गाने साधारण ३ ते ४ तास लागतात. मात्र, नव्या बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत कापले जाणार आहे. इतकेच नाही, तर पुणे ते हैदराबाद हा तासनतासांचा प्रवास आता केवळ २ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे वरदान ठरणार आहे. 

Related Articles

Related image1
इराण-इस्रायल तणावाचा थेट फटका मुंबईला! दक्षिण मुंबईत घर घेणं आता आणखी महागणार; जाणून घ्या नेमकं कारण
Related image2
पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं! ST च्या ४५० जादा गाड्या धावणार; पाहा तुमचे रूट!
35
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचं काय झालं? विदर्भाची प्रतीक्षा कायम?
Image Credit : Google

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचं काय झालं? विदर्भाची प्रतीक्षा कायम?

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोरात आहे. मात्र, नव्या घोषणेत पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद मार्गांना झुकते माप मिळाल्याने विदर्भातील प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. समृद्धी महामार्गानंतर आता 'बुलेट' वेगाने नागपूर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

45
समुद्राखालील बोगदा आणि आधुनिक रेल्वेची झलक
Image Credit : Google

समुद्राखालील बोगदा आणि आधुनिक रेल्वेची झलक

भारतीय रेल्वेने आता जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.

समुद्राखालील थरार: देशातील पहिल्या समुद्राखालील २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नद्यांवरील पूल: १७ महत्त्वाच्या नद्यांवरील पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

ऑटोमॅटिक डोअर्स: मुंबई लोकलसाठी २३८ नवीन स्वयंचलित दरवाजांच्या गाड्यांची निर्मिती आणि ३००० कोटींचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

55
पुढील काही वर्षांत भारतीय रेल्वेचे रूप पालटणार
Image Credit : Gemini AI

पुढील काही वर्षांत भारतीय रेल्वेचे रूप पालटणार

पुढील काही वर्षांत भारतीय रेल्वेचे रूप पूर्णपणे पालटलेले असेल आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुपरफास्ट होईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Baby Sold For Smartphone : फोनसाठी आई-वडिलांनीच विकलं स्वतःचं बाळ, आजारपणामुळे फुटलं बिंग
Recommended image2
Walmik Karad : वाल्मिक कराडभोवती 12 हायटेक कॅमेरे, मोबाइलचा वापर शक्य नाही; बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा
Recommended image3
Mazagon Dock : माझगाव डॉकचा थुथुकुडी प्रोजेक्ट रद्द, आता महाराष्ट्रावर फोकस
Recommended image4
Devendra Fadnavis: निवडणूक आयोगावरील आरोप हा 'फेक नॅरेटिव्ह', फडणवीसांचा पलटवार
Recommended image5
Diveagar Beach Tragedy : 'खोल पाण्यात जाऊ नका', दिवेआगरमध्ये 8 मुलांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Related Stories
Recommended image1
इराण-इस्रायल तणावाचा थेट फटका मुंबईला! दक्षिण मुंबईत घर घेणं आता आणखी महागणार; जाणून घ्या नेमकं कारण
Recommended image2
पुणेकरांनो, उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचं टेन्शन मिटलं! ST च्या ४५० जादा गाड्या धावणार; पाहा तुमचे रूट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved