पुणे शहरात रात्री झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ट्रकचालकाला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात केली तपासणी

| Published : May 28 2024, 10:25 AM IST / Updated: May 28 2024, 10:26 AM IST

accident news 02.jpg
पुणे शहरात रात्री झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ट्रकचालकाला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात केली तपासणी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुणे शहरात सध्या अपघात मोठ्या प्रमाणावर होत असून येथे रात्री ट्रकने गाडीला उडवल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुणे शहरात अपघातांची मालिका सध्या थांबायचे नाव घेताना दिसून येत आहे. कल्याणीनगर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर परत एकदा दुसरे प्रकरण घडले असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे- अहमदनगर रोडवरील खराडी जकात नका येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला चिरडले. त्याने दुचाकीला चिरडल्यामुळे दोघं विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

View post on Instagram
 

नेमकं काय झाल? - 
खराडी जकात नाका येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील विद्यार्थ्यांना उडवले. ही घटना घडली तेव्हा रात्रीचे १०:३० वाजले होते. या अपघात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी अवस्थेत सापडली आहे. ट्रक हा चंदननगरच्या दिशेने जात असताना जकात नाका येथील ट्राफिक सिग्नलवर थांबलेल्या मोटारसायकलला धडक दिली आणि त्या धडकेतच या दोघांचा मृत्यू झाला आहे. 

ट्रकचालकाचे नाव शामबाबू रामफळ गौतम असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांपैकी एकाचीच ओळख पटली असून बाकी दोघांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गौतम या ड्रायव्हरला अटक केली असून अधिक तपासासाठी त्याला ससून रुग्णालयात घेऊन गेले आहेत. दिवसेंदिवस पुणे शहरातील अपघातांची संख्या वाढत असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
आणखी वाचा -