नागपूरात समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकींवर मानसोपचार तज्ज्ञाकडून अत्याचार

| Published : Jan 15 2025, 05:41 PM IST / Updated: Jan 15 2025, 08:04 PM IST

rape of a girl child
नागपूरात समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकींवर मानसोपचार तज्ज्ञाकडून अत्याचार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

नागपुरात एका मानसोपचार तज्ज्ञाने अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

नागपूर: शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मानसोपचार तज्ज्ञाने उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी एका 45 वर्षीय मानसोपचार तज्ज्ञाला अटक करण्यात आली आहे. पूर्व नागपुरातील तुरुंगात डांबलेल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या निवासी क्लिनिकमधून आणखी भयावह कथा समोर येत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात पहिले प्रकरण समोर आले होते. आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणीला तिचे त्या वेळेचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सबंधित तरुणीने हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा या विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या अनेक वर्षांच्या दुष्कृत्याचा भंडाफोड झाला. पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवत आरोप लागलेल्या मानसोपचार तज्ज्ञाला पॉक्सो आणि लैंगिक छळाच्या आरोपात अटक केली होती. यामध्ये नंतर जानेवारी महिन्यात दोन तक्रारी समोर आल्यावर आतपर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहे. त्यामध्ये तिन्ही पीड़ित वेगवेगळ्या आहे. पीडितांपैकी बऱ्याच जणी विवाहित आहेत आणि सामाजिक भीतीने त्यांना औपचारिक पोलिस तक्रार नोंदवणे कठीण जात आहे.

आणखी वाचा-  पत्नीने नोकरी मिळाल्यावर पतीला सोडले, १ कोटीची मागणी

मानसोपचारतज्ज्ञ-कम-काउंसलर, जो स्वतःला आपल्या विषयात सुवर्णपदक विजेता असल्याचा दावा करत असे, पालकांना आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व आणि मानसिक विकासासाठी तसेच शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी दिवसभराच्या सत्रांसाठी त्यांच्याकडे पाठवण्यास प्रवृत्त करत असे. “या मानसोपचारतज्ज्ञाने आपल्या कोर्ससाठी भरमसाठ शुल्क घेतले, जे वार्षिक ९लाख रुपयापर्यंत असायचे, असे एका सुत्राने सांगितले.

सुत्रांनी सांगितले की, तो मुलींना त्यांच्या ताणतणाव आणि शारीरिक व मानसिक समस्यांवर उपाय म्हणून ‘अक्यूप्रेशर’च्या नावाखाली त्याच्या चेंबरमध्ये अनुचित प्रकारे स्पर्श करत असे. “तो आधी मुलींच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची व वैयक्तिक आयुष्याची सविस्तर माहिती गोळा करत असे आणि त्यांचा विश्वास जिंकत असे. त्यानंतर, तो त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात करत असे, ज्याची सुरुवात स्पर्शापासून होत असे, त्यानंतर दारूची ऑफर देत असे आणि शेवटी त्यांचे लैंगिक शोषण करत असे. तो असा विश्वास देत असे की असे करणे ताण कमी करण्यासाठी आणि शैक्षणिक लक्ष केंद्रित वाढवण्यासाठी गरजेचे आहे.

आणखी वाचा-  थायलंड बाथटबमध्ये यूपी डॉक्टरच्या पत्नीचा मृतदेह! श्रीदेवी प्रकरणाची आठवण?

याशिवाय, मानसोपचारतज्ज्ञ मुलींना पटवून देत असे की, शारीरिक संबंध अपरिहार्य आहेत. त्याने त्यांच्या जवळच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले.

मुलांसाठी सेंटर चालवत असलेल्या ठिकाणी काही स्टाफ होता का? कशा पद्धतीने लोकांचं तो कौन्सिलिंग करत होता. त्यात हा प्रकार करत होता. तसेच मागील सात वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचं सध्या तरी प्राथमिक तपासात समोर आल आहे. त्याने या सीसीटीव्हीमध्ये सहकारी मुलीचे अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले असल्याची माहिती समजते या व्हिडिओच्या माध्यमातूनच हा मानसोपचार तज्ञ ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी आणखी काही तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.