अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा

| Published : May 24 2024, 08:12 AM IST / Updated: May 24 2024, 08:13 AM IST

pune hadsa

सार

पुणे कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघाताचे नवीन ट्विस्ट समोर आले आहे. यावर अल्पवयीन आरोपींच्या मित्रांनी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. 

पुणे येथील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताचे रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. शनिवारी रात्री अल्पवयीन आरोपीने कल्याणीनगर परिसरात वेगाने गाडी चालवून दोन आयटी अभियंत्यांचा बळी घेतला. या घटनेचे पाडसात संपूर्ण राज्यात पडले असून लोकप्रतिनिधींपासून ते जनतेपर्यंत सर्वांनीच हे प्रकरण लावून धरल्यामुळे आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. 

मित्रांनी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा केला दावा - 
शनिवारी रात्री अपघात झाला तेव्हा अल्पवयीन आरोपी नाही तर ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केला आहे. आरोपीसोबत अपघाताच्या वेळी गाडीमध्ये असलेल्या दोन मित्रांनी हा दावा केला आहे. आरोपीचा जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना आजपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. 

प्रकरणात आला नवीन ट्विस्ट - 
या अपघाताच्या प्रकरणात आता नवीन ट्विट आला असून याबाबतची अपडेट समोर आली आहे. अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत होता असे कुटुंबाच्या आणि मित्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. चालकाची गुरुवारी परत चौकशी करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांनी नियुक्त केलेला ड्रायव्हर पोर्शे गाडी चालवत होता असा दावा करण्यात येत आहे. 

अल्पवयीन मुलाच्या आजोबाची करण्यात आली चौकशी - 
पोर्शे नावाची गाडी अग्रवाल कुटुंबाच्या मालकीच्या रिॲलिटी फर्मच्या नावावर आहे, त्यामुळे याबाबतची अधिक चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपीच्या आजोबांची चौकशी करण्यात येत आहे. घडलेल्या घटनेचा क्रम समजून घेण्यासाठी सर्व प्रकरण पोलीस माहिती करून चौकशी करत आहेत. 
आणखी वाचा - 
25 दिवसानंतर...सर्वत्र क्षेपणास्र आणि गोळीबार होणार, 8 जूनसंदर्भात करण्यात आलीय ही मोठी भविष्यवाणी
Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोटात 7 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी, कामगार कुटुंबात हळहळ