सार

World War III : नास्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्यासह काही ज्योतिषांनी तिसऱ्या महायुद्धासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. पण तिसऱ्या महायुद्धाबद्दल अनिश्चितताही आहे. तरीही वेळोवेळी सोशल मीडियावर याच्या भविष्यवाणीच्या बातम्या समोर येत राहतात.

World War-3 :  तिसऱ्या महायुद्धाबद्दल गेल्या काही दशकांपासून तर्कवितर्क लावण्यासह याबद्दल वादही होतात. याआधीच्या दोन महायुद्धाबद्दलची स्थिती संपूर्ण जगाने पाहिली आहे. नास्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्यासह काही ज्योतिषांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी देखील केली असली तरीही याची अनिश्चितता आहे. तरीही वेळोवेळी सोशल मीडियावर तिसऱ्या महायुद्धाच्या बातम्या फिरतात. अशातच भारतीय ज्योतिषी कुशल कुमार यांनी एक भविष्यवाणी केली आहे.

काय म्हटलेय कुशल कुमार यांनी?
कुशल कुमार (Kushal Kumar) यांनी मीडिमवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कुशल कुमार यांनी म्हटलेय की, 'काही देशांवर राज्य करणाऱ्यांना प्रमुख चिंतेच्या उदयोन्मुख परिस्थितींचा सामना करणे कठीण होऊ शकते'काही गंभीरपणे आजारी पडण्याची शक्यता आहे किंवा ते राजीनामा देऊ शकतात. राजकरणात घडामोडी होतील याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात काय, जिथे नेता कमकुवत आहे, समकालीन ग्रहांच्या हालचालींवरून असे सूचित होते की सैन्य पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊल टाकू शकते. यानंतर ज्योतिषांनी तिसरे महायुद्ध कोणत्या तारखेला सुरू होईल याचाही उल्लेख केला आहे. (येथे वाचा कुशल कुमार यांची भविष्यवाणी)

18 जूनला तिसरे महायुद्ध होणार?
कुशल कुमार यांनी पुढे म्हटलेय की, मंगळवार 18 जून, 2024 रोजी तिसरे महायुद्धा छेडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 10 जून आणि 29 जूनच्या तारखेचे देखील यामध्ये योगदान असू शकते.

कोण आहेत कुशल कुमार?
पंचकुला येथे राहणारे कुशल कुमार स्वत:ला ज्योतिष मानतात. ते जगातील घटनांबद्दलच्या काही भविष्यवाणी करतात. हेच कारण आहे की, तिसऱ्या महायुद्धाच्या बातमीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. हे दावे ब्रिटेनच्या अधिकाऱ्यांद्वारे नारिकांना सांगण्यासाठी एक वेबसाइट लाँच केल्यानंतरच्या काही दिवसांनी समोर आली आहे. अशातच कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा : 

कोण आहेत इब्राहिम रईसी, हेलीकॅप्टर अपघातानंतर झाले गायब

'भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि आपण...',पाकिस्तानच्या खासदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)