PM Modi Solapur Visit : भक्तिमय वातावरणात गृहप्रवेश झालाय, नव्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करा - PM मोदींचे आवाहन

| Published : Jan 19 2024, 02:43 PM IST / Updated: Jan 19 2024, 08:08 PM IST

PM Narendra Modi

सार

PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 जानेवारी) महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये (PM Modi in Solapur) विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. 

PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 जानेवारी) महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान  2 हजार कोटी रुपयांच्या सात अमृत प्रकल्पांचे भूमिपूजन केले. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 90 हजारहून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. 

उपस्थितांशी संवाद साधनाता यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आताचा काळ आपणा सर्वांसाठी भक्तिभावाचा काळ आहे. 22 जानेवारीला असा ऐतिहासिक क्षण येणार आहे, ज्यावेळेस आपले प्रभू श्री राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.

‘भक्तिमय वातावरणात 1 लाखांहून अधिक कुटुंबाचा गृहप्रवेश’

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असेही म्हणाले की, दशकांपासूनची जुनी वेदना आता दूर होणार आहे. मी सध्या यम नियमांचे पालन करत आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी 11 दिवसांची साधना पूर्ण करू शकेन. मित्रांनो, हा देखील योगायोगच म्हणावा लागेल की माझ्या या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधील पंचवटीतून सुरू झाली. 

आज 1 लाखांहून अधिक कुटुंबांचा भक्तिमय वातावरणात गृहप्रवेश होत आहे. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक कुटुंब आपल्या पक्क्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक, पाहा व्हिडीओ

"केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhanmantri Awas Yojna) रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे", असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • आमचे सरकार प्रभू श्री रामाच्या आदर्शावर चालत आहे
 • देशातील 10 कोटी गरीब लोकांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात आला
 • आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांच्या 1 लाख कोटी रुपयांची बचत झाली
 • देशात 10 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत
 • आमच्या सरकारने कोट्यवधी गरीब नागरिकांना कायमस्वरूपी घरे दिली
 • पीएम जनऔषधी केंद्रामुळे गरिबांच्या 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली
 • गरिबांना जनऔषधी केंद्राद्वारे 80 टक्के कमी दरात औषधे मिळत आहेत
View post on Instagram
 
 • जन धन योजनेच्या माध्यमातून आमच्या सरकारने 50 कोटी गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले
 • स्वनिधी योजनेंतर्गत देशभरातील लाखो लोकांना कर्ज देण्यात आले
 • मोदींनी गरिबांची जबाबदारी घेतली, गरिबांना कर्ज मिळाले आणि ते व्यवसाय करत आहेत
 • आमच्या सरकारने प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाण्यासाठी जल योजना राबवली
 • विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा  
 • मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले
View post on Instagram
 

पहिल्या टप्प्यातील घरांचे लोकार्पण

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील रे नगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 30 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण शुक्रवारी संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

अमृत 2.0 योजनेतील राज्यातील चार महानगरपालिका आणि तीन नगरपालिकांच्या एकूण 1 हजार 201 कोटी रुपये खर्चाच्या सात पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन, पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.

आणखी वाचा

Ram Mandir Ayodhya : राम मंदिरामध्ये रामललांची मूर्ती स्थापित, 4 तासांच्या अनुष्ठानानंतर मूर्तीचे गर्भगृहात आगमन

VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध

Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य व उपासनेचे महत्त्व, जाणून घ्या सविस्तर