- Home
- India
- VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध
VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध
- FB
- TW
- Linkdin
Shri Ram Janmbhoomi Postage Stamp : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा स्मारक टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदींनी प्रभू श्री राम यांच्यावर आधारित जगभरात जारी करण्यात आलेल्या टपाल तिकिटांचे पुस्तकही प्रकाशित केले. याबाबत पंतप्रधान मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून खास संदशेही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा विशेष स्मारक टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळाली. प्रभू श्री राम यांच्यावर आधारित जगभरातील विविध देशांमध्ये जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या पुस्तकाचंही प्रकाशन करण्यात आले. पोस्टल स्टॅम्प पत्रांवर प्रयोग तर केले जातात, त्यामुळे याद्वारे विचार, ऐतिहासिक घटनांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचेही कार्य केले जाते”.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित स्मारक टपाल तिकीट व जगभरात प्रभू श्री राम यांच्यावर आधारित जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
डिझाइनमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हारी', सूर्य, शरयू नदी, मंदिर परिसरातील शिल्पांचा समावेश आहे.… pic.twitter.com/k9MffXimVz— Asianet News Marathi (@AsianetNewsMH) January 18, 2024
श्री राम जन्मभूमीवर आधारित सहा विशेष टपाल तिकिटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा स्मारक टपाल तिकिटे गुरुवार (18 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या डिझाइनमध्ये राम मंदिराव्यतिरिक्त चौपई 'मंगल भवन अमंगल हारी', सूर्य, शरयू नदी, मंदिराच्या परिसरातील शिल्पांचाही समावेश आहे. राम मंदिर, श्री गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवटराज आणि माता शबरी अशा एकूण सहा टपाल तिकिटांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास संदेश
श्री राम मंदिरावर आधारित विशेष स्मारक टपाल तिकिटे व तिकिटांचे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून एक खास संदेशही जारी केला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या टपाल तिकिटांच्या पुस्तकामध्ये प्रभू श्री राम यांच्यावर आधारित जगभरातील विविध देशांमध्ये जारी केलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह आहे.
VIDEO : श्री राम मंदिरावर आधारित स्मारक टपाल तिकीट व जागतिक स्तरावर जारी केलेल्या तिकिटांचे पुस्तक प्रकाशन केल्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास संदेश #PostageStamps #ShriRamJanmbhoomiMandir #LordRama #RamMandir #AyodhyaRamMandir #Ayodhya #RamJanambhoomi… pic.twitter.com/8w7Z4WC3SF
— Asianet News Marathi (@AsianetNewsMH) January 18, 2024
पंतप्रधान मोदींनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये भगवान राम यांच्यावर आधारित जगातील विविध देशांमध्ये जारी केलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह आहे. यामध्ये अमेरिका, सिंगापूर, कॅनडासह 20हून अधिक देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांचा समावेश आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळेस दिली.
आणखी वाचा :
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात पोहोचली कलश यात्रा, आता रामललांच्या मूर्तीची होणार स्थापना
Ayodhya Ram Mandir : रामललांसाठी तयार केला तब्बल 1 हजार 265 किलोचा महाकाय लाडू, WATCH VIDEO
Veerabhadra Temple : पंतप्रधान मोदींनी वीरभद्र मंदिरात केली पूजा, राम भजनही गायले PHOTOS