Ram Mandir Ayodhya : राम मंदिरामध्ये रामललांची मूर्ती स्थापित, 4 तासांच्या अनुष्ठानानंतर मूर्तीचे गर्भगृहात आगमन

| Published : Jan 19 2024, 12:25 PM IST / Updated: Jan 19 2024, 12:36 PM IST

Ram Mandir Ayodhya
Ram Mandir Ayodhya : राम मंदिरामध्ये रामललांची मूर्ती स्थापित, 4 तासांच्या अनुष्ठानानंतर मूर्तीचे गर्भगृहात आगमन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Ram Mandir Ayodhya : रामलला यांची मूर्ती विधिवत पद्धतीने त्यांच्या आसनावर ठेवण्यात आली आहे. मंत्रोच्चारांच्या गजरात रामललांची मूर्ती गर्भगृहामध्ये ठेवली गेली आहे.

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमधील भव्य राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी गुरुवारी (18 जानेवारी) रामलला यांची मूर्ती गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली आहे.  

विधिवत पद्धतीने, मंत्रोच्चारांच्या गजरामध्ये रामलला यांची मूर्ती गर्भगृहामध्ये स्थापित केली गेली.

View post on Instagram
 

जय श्री रामाच्या जयघोषात रामललांच्या मूर्तीचे मंदिराच्या गर्भगृहामध्ये आगमन झाले. यानंतर महत्त्वपूर्ण पूजा-विधी सुरू असताना बालस्वरूपातील भगवान श्रीरामाची मूर्ती त्यांच्या आसनावर स्थापित करण्यात आली. यानंतर अन्य अनुष्ठानास सुरुवात करण्यात आली आहे. रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 16 जानेवारीपासून विशेष पूजाविधी सुरू करण्यात आल्या आहेत. शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या रामलला यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली.

View post on Instagram
 

22 जानेवारीचा शुभ मुहूर्त

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, "राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रामलला यांच्या मंदिरामध्ये गर्भगृह असेल, ज्यामध्ये एकूण पाच मंडप बांधण्यात आले आहेत. मंदिर तळमजल्यावर असेल. पहिल्या मजल्यावर काही काम पूर्ण होणे बाकी आहे, येथे राम दरबार असेल".

मंदिराचा दुसरा मजला धार्मिक विधींसाठी असणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ, हवन, विधी केले जातील". पुढे ते असेही म्हणाले की, “22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे. यासाठी पूजाविधी सुरू करण्यात आल्या आहेत. 16 जानेवारीपासून या विशेष अनुष्ठानास सुरुवात झाली आहे”.

पंतप्रधान मोदी करताहेत 11 दिवसांचे धार्मिक अनुष्ठान

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील 11 दिवसांचे धार्मिक अनुष्ठान करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. रामलला यांचे मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी याबाबत आनंद व्यक्त केला. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये देश-परदेशातील 7 हजार पाहुणेमंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी

अयोध्येतील राम मंदिरामध्ये पार पडणाऱ्या रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अर्धा दिवस सुटी मिळणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी (18 जानेवारी) ही माहिती दिली आहे.

आणखी वाचा

VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध

Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य व उपासनेचे महत्त्व, जाणून घ्या सविस्तर

Ram Mandir Ayodhya : श्री रामाचे हे 11 मंत्र करू शकतात प्रत्येक दुःख दूर, 22 जानेवारीला करा जप

Read more Articles on