सार

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत सुप्रिया सुळे यांचे नाव असल्याने आता पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे.

मुंबई : बारामती मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार’ गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांच्या नावांची आज घोषणा करण्यात आली. अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या या मतदारसंघात ‘सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रावहिनी’ अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे या त्यांच्या चुलत बहीण आहेत.

बारामतीमधून ही दोन्ही नावे अपेक्षित असली तरी मधल्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे नाव पुढे आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन परभणीतून महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा केली.

त्यानंतर काही वेळाने ‘राष्ट्रवादी’च्या शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी पुन्हा तातडीने पत्रकार परिषद बोलावली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्या साठी खूप मोठा आहे. वरिष्ठांनी ठेवलेला विश्वासाला मी सार्थ ठरणार असून हा लढा विचारांविरुद्ध असल्याचे त्यांनी म्हंटले.

तर शरद पवार गटातील इतर उमेदवारांची नावे अशी की, शिरूर मधून अमोल कोल्हे, दिंडोरीतून भास्कर भांगरे, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना वर्धा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी (एसटी) मतदारसंघात भगरे यांची लढत केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या विद्यमान खासदार भारती पवार यांच्याशी होणार आहे. पारनेरचे विद्यमान आमदार लंके यांचा अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी सामना होणार आहे.

बारामती मतदारसंघाचा 55 वर्षाचा इतिहास:

55 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांनी 1967 मध्ये पहिल्यांदा बारामतीमधून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली. 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा राखली.त्यानंतर सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आणि 2009 पासून त्या या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

आणखी वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मिळाले तिकीट

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह 'या' व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांनी केला सन्मान

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलास गेहलोत हे ईडी कार्यालयात हजर, जबाबासाठी बोलवल्याचे दिले कारण