माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह 'या' व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांनी केला सन्मान

| Published : Mar 30 2024, 01:00 PM IST

president1

सार

राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी पाच व्यक्तींना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान केला. राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केला आहे. हे चारही पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेत.

दिवंगत माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला. चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत सिंह यांनी दादांचा पुरस्कार स्वीकारला. यासोबतच एमएस स्वामिनाथन यांची मुलगी नित्या रावही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला पोहचल्या होत्या. 

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभ
राष्ट्रपती भवनातीलच दरबार हॉलमध्ये शनिवारी भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते आणि व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 : मुंबईतील दक्षिण मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना लढणार, राहुल शेवाळेंचा विजय होणार?