महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोंधळ वाढला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटले आहे.
Nashik Rain Update : नाशिकमधील रामकुंड परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखत युवक वाहून गेल्याने आईने टाहो फोडला.
अकोला येथील 26 वर्षीय UPSC विद्यार्थी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील पीजीमध्ये आत्महत्या केली. 21 जुलै रोजी लटकलेल्या अवस्थेत सापडले. विद्यार्थ्याची सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत. त्यामुळे धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे काम वेगाने करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साताऱ्यातील बोरने घाटात घडली.
दिल्लीत अंजली गोपनारायण हिला UPSC परिक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव आणि इतर अडचणी तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत. त्यामुळे आता तरी सरकारने संवेदशील होऊन या विद्यार्थ्यांच्या समस्य़ाकडे लक्ष द्यावे.
पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची गरज आहे. आपण एकजुटीने मैदानात उतरलो तर विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना थेट अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळतेय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात सभा घेऊन शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती. त्याला शनिवारी उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका करत उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.