MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • PM Kisan Samman Nidhi : असे २ मिनिटांत पैसे मिळाले की नाही करा चेक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम जमा

PM Kisan Samman Nidhi : असे २ मिनिटांत पैसे मिळाले की नाही करा चेक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम जमा

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता आज २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० थेट हस्तांतरित केले.

2 Min read
Asianetnews Marathi Stories
Published : Aug 02 2025, 01:24 AM IST| Updated : Aug 02 2025, 12:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पीएम किसानमध्ये किती आर्थिक मदत मिळते?
Image Credit : Asianet News

पीएम किसानमध्ये किती आर्थिक मदत मिळते?

या योजनेची सुरुवात २०१९ साली झाली होती. या अंतर्गत केंद्र सरकार देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत देते. ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत १९ हप्त्यांमधून मदतीचा लाभ मिळालेला असून, २० वा हप्ता २ ऑगस्टला म्हणजेच आज जमा करण्यात आले.

26
पैसे कधी आणि कसे मिळतात
Image Credit : Asianet News

पैसे कधी आणि कसे मिळतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून २ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज हा हप्ता जाहीर केला. शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे ₹२,००० जमा झाले. या योजनेत पारदर्शकता आणि अचूकतेला प्राधान्य दिले जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले असावे आणि जमिनीच्या मालकीचे कागदपत्र अधिकृतपणे तपासलेले असावेत. अन्यथा शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana : या तारखेला किती वाजता जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
Related image2
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनानिमित्त कडक ५ भाषणे, आत्मविश्वास करतील द्विगुणित
36
पैसे जमा झाले कसे तपासावे...
Image Credit : Asianet News

पैसे जमा झाले कसे तपासावे...

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in

"किसान कॉर्नर" या विभागात जा

"Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)" या पर्यायावर क्लिक करा

तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका

कॅप्चा कोड भरा आणि "Get Data" वर क्लिक करा

स्क्रीनवर तुमचा हप्ता प्राप्त झाला आहे की नाही याची माहिती दिसेल

46
रकमेचा लाभ किती लोकांना?
Image Credit : Asianet News

रकमेचा लाभ किती लोकांना?

या २० व्या हप्त्यात देशातील सुमारे ९.३ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹२,००० रकमेचा लाभ मिळाला आहे. म्हणजेच सुमारे ₹२०,५०० कोटींचे वितरण एका दिवसात करण्यात आले आहे. 

ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी स्थैर्य आणि आधार देणारी योजना ठरली आहे. शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी नियमित आर्थिक मदतीचा हा आधार त्यांच्या शेतीला चालना देतो व जीवनमान उंचावतो.

56
मोदींचा शनिवारचे वाराणसी दौरा
Image Credit : Asianet News

मोदींचा शनिवारचे वाराणसी दौरा

पंतप्रधान वाराणसीत सुमारे ₹2200 कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करणार

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे ₹2200 कोटी खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, नागरी विकास, सांस्कृतिक वारसा आदी विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.

स्मार्ट डिस्ट्रीब्युशन प्रकल्पाअंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

पंतप्रधान स्मार्ट डिस्ट्रीब्युशन प्रकल्पांतर्गत विविध कामांचे तसेच विद्युत पायाभूत सुविधांच्या अंडरग्राउंडिंगचे भूमिपूजन करतील.

सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या जलसाठ्यांचे संवर्धन

सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या कुंडांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान विविध कुंडांमध्ये जलशुद्धीकरण आणि देखभालीच्या कामांचेही भूमिपूजन करतील.

66
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर
Image Credit : ANI

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर

पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जाहीर केला आणि ९.७ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹२०,५०० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. योजनेअंतर्गत एकूण रक्कम ₹३.९० लाख कोटींपेक्षा अधिक आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत वितरित केलेली एकूण रक्कम आता ₹३.९० लाख कोटींच्या पुढे जाणार आहे.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
Recommended image2
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
Recommended image3
नायरा एनर्जी बनली गोवा येथील इंडिया H.O.G.™️ रॅली 2025 ची अधिकृत फ्यूलिंग पार्टनर
Recommended image4
आज दत्त जयंती : असे करा पूजन, शुभ मुहूर्त, पुजा-विधी, मान्यता, मंदिरे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात
Recommended image5
Jain Community Morcha : मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा विराट मोर्चा; ‘जीव दया आणि कबूतर बचाव’ अभियानाची जोरदार सुरुवात
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana : या तारखेला किती वाजता जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
Recommended image2
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनानिमित्त कडक ५ भाषणे, आत्मविश्वास करतील द्विगुणित
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved