पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून, बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जड वाहनांना रात्रीच्या वेळी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर हा बदल करण्यात आली.

पुणे: पुणे शहरात रात्रीच्या वेळी ट्रॅफिकची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी आणि बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जड वाहनांना नियंत्रित स्वरूपात परवानगी देण्यासाठी वाहतूक विभागाकडून अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध सशर्त शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळं नवीन आदेशानुसार अवजड वाहनांना रात्रीच्या वेळी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्वावर बदलाला सुरुवात 

प्रायोगिक तत्वावर पुणे शहरात बदलाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाणार असून बांधकामाशी संबंधित डंपर, रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर अशा जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र "स्लो मुव्हिंग" वाहने जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर तसेच इतर सामान्य मालवाहू वाहने यांना पूर्वीप्रमाणेच वाहतूक निर्बंध असणार आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न 

शहरावरील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. आदेशाचे काटोकोर पालन करण्याचे अवाहन बांधकाम व्यावसायिक आणि वाहनचालकांना केलं आहे. आदेशांचे उल्लंघन करण्यावरून मोटार वाहन उल्लंघन केल्यावर कारवाई करण्यात आली आहे.

परवानगीचे वेळापत्रक 

पुणे शहरात जड वाहनांच्या वाहतुकीसाठी नियमांमध्ये काही सशर्त बदल करण्यात आले आहेत. २ ते २३ ऑगस्टदरम्यान प्रत्येक शनिवारी आणि १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी, दुपारी ४ ते रात्री १० वगळता उर्वरित वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, ३ ते २४ ऑगस्टदरम्यान प्रत्येक रविवारी, वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या रेड झोन वगळता शहरात सर्वत्र दिवसभर जड वाहनांची वाहतूक मुभा असणार आहे.