केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या भाजप संवाद यात्रेला उपस्थित राहणार आहेत.
छगन भुजबळ यांनी रविवारी बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती.
रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Mukhyamantri Warkari Sampradaya Mahamandal : महाराष्ट्र सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे होणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई, मनोरमा खेडकर, यांना शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी पिस्तुलाचा परवाना का रद्द केला जाऊ नये, याचे स्पष्टीकरण द्यावे.
महाराष्ट्रातील कसारा घाटात एक भीषण अपघात झाला, ज्यात कंटेनरची ब्रेक फेल झाल्यामुळे सात गाडयांना टक्कर दिली. विकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक होते. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली.
Pooja Khedkar Audi Car Seize : शनिवारी रात्री खेडकर यांच्या कुटुंबीयांनी गाडीच्या चाव्या चतुश्रृंगी वाहतूक पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत.
Amravati Hit And Run Accident : अमरावती शहरात एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू झाला आहे.
खेडकर कुटुंबीयांकडून पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलंय. फुटपाथवर कठडे करून त्यात झाडे लावण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.