राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्या एका ग्रामसेवकाला धमकावताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे.

परभणी: सध्याच्या राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाठ यासारख्या वाचाल मंत्र्यांचे प्रकरण बाहेर येत आहेत. त्यामुळं सत्ताधारी सरकार अडचणीत सापडत आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मेघना बोर्डीकर काय म्हणाल्या? 

"याद राख ही मेघना बोर्डीकर आहे. तुला पगार कोण देतं? माझ्यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही. तू या गावात काय कारभार करतोस हे मला माहित नाही का? तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकीन" असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत म्हटलं होतं. त्यांनी एका ग्रामसेवकाला उद्देशून म्हटल्यामुळं या व्हिडिओवर नागरिकांनी कमेंट केल्या आहेत.

आमदार रोहित पवार यांनी काय ट्विट केलं? - 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातला व्हिडिओ ट्विट करत एकीकडे रमी खेळणारे मंत्री आणि दुसरीकडे सभेला लाभार्थी आणण्याचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे, ग्रामविकास अधिकाऱ्याला थेट कानाखाली लावून बडतर्फ करण्याच्या धमक्या देणारे मंत्री, मुख्यमंत्री फडणवीस कसे सांभाळू शकतात असा प्रश्नच उपस्थित केला आहे.

Scroll to load tweet…

मेघना बोर्डीकर कुठं बोलल्या - 

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बोरी सर्कल मधील 17 ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री ग्राम आवास योजना टप्पा दोन अंतर्गत, लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृह प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरकारी अधिकारी उपस्थित असल्याचं व्हिडिओतून दिसून आलं आहे.

तुझ्या कानाखाली वाजविल - 

तुझ्या कानाखाली वाजविल असं मेघना बोर्डीकर यांनी बोलताना म्हटलं आहे. राज्यभर या व्हिडीओचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव असलेल्या ट्रक मधून अवैद्य दारू सापडली होती आणि आता लगेचच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.