भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नागपूरमध्ये युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुखच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. दिव्याने नुकत्याच FIDE महिला विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल तिचे कौतुक केले.
नागपूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपूरमध्ये युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुखच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला आणि अभिनंदन केले. दिव्याने नुकत्याच FIDE महिला विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल तिचे कौतुक करताना त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान, सरन्यायाधीश गवई म्हणाले की, दिव्या ही अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. के. जी. देशमुख यांची नात आहे आणि गवई कुटुंबही मूळचे अमरावतीचे असल्याने गेल्या ६० वर्षांपासून या दोन कुटुंबांचे खूप जवळचे संबंध आहेत. दिव्याच्या या यशाच्या निमित्ताने त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
'तुझं यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद'
दिव्याचा सत्कार करताना सरन्यायाधीश म्हणाले, "दिव्याने मिळवलेले यश केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या या कामगिरीमुळे अनेक तरुणांना नवीन प्रेरणा मिळेल आणि यशाचे नवे शिखर गाठण्याची उमेद निर्माण होईल."
कोण होती दिव्या देशमुख?
मूळची नागपूरची असलेली १९ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या २०२५ च्या FIDE बुद्धिबळ विश्वचषकात विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत तिने आपल्याच देशाची अनुभवी खेळाडू कोनेरु हम्पीचा पराभव केला.
याआधी उपांत्य फेरीत तिने चीनच्या टॅन झोंगीला हरवले. तर, क्वार्टर फायनलमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्ली हिला पराभूत करून ती उपांत्य फेरीत पोहोचली होती. या स्पर्धेत तिने अनेक अनुभवी आणि मोठ्या खेळाडूंना हरवून जगभरात आपले नाव कमावले. दिव्याचे हे यश केवळ तिची वैयक्तिक कामगिरी नसून, भारतीय महिला बुद्धिबळ जागतिक स्तरावर नवीन उंचीवर पोहोचले आहे, हे देखील दर्शवते.


