श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण तापले. विरोधीपक्ष या योजनेला निवडणुकीचा जुमला म्हणत टीका करत आहेत तर सत्ताधारी पक्ष या योजनेचे समर्थन करत आहेत. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी या योजनेवरून सत्ताधार्यांना टोला लगावला आहे.