Kundeshwar Accident: श्रावणी सोमवारी कुंडेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली.
कडूस (ता. शिरूर): श्रावणी सोमवारच्या निमित्ताने दर्शनासाठी श्री क्षेत्र कुंडेश्वरकडे निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप गाडीला आज सकाळी गंभीर अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पाईट गावातील २० ते २५ महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर दर्शनासाठी पिकअप गाडीने प्रवास करत होत्या. घाट परिसरात आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत पलटी झाली.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. १० हून अधिक रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
घटनास्थळी प्रशासनाचे पथक तत्काळ दाखल झाले असून, जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाईटचे माजी सरपंच जयसिंग दरेकर यांनीही मदतकार्य सुरू असल्याची माहिती दिली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला भाविकांची नावे
साळुंखे रुग्णालय
शोभा जानेश्वर पापळ
सुमन काळुशम पापळ
शारदा रामदास चोरघे
शंकुतला तान्हाजी चोरघे
चांडोली रुग्णालय
मंदा कान्हीफ दरेकर
संजीवनी कैलास दरेकर
मीराबाई संभाजी चोरघे
गावडे रुग्णालय
बायडाबाई दरेकर
अपघातात जखमी झालेल्या महिला व व्यक्तींची यादी
साळुंखे रुग्णालय
शकुंतला तानाजी चोरघे (वय ५०)
चित्रा शरद करंडे (वय ३२)
चंद्रभागा दत्तात्रय दरेकर (वय ६५)
मंदा चांगदेव पापळ (वय ५५)
शिवतीर्थ रुग्णालय
लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर (वय ५५)
कलाबाई मल्हारी लोंढे (वय ५५)
रुषिकेश करंडे
जनाबाई करंडे
फसाबाई सावंत
सुप्रिया लोंढे
निशांत लोंढे
बांबले रुग्णालय
कविता सारंग चोरघे (वय ३५)
सिद्धिक रामदास चोरघे (वय २१)
छबाबाई निवृत्ती पापळ (वय ६०)
गावडे रुग्णालय
शंकुतला चोरघे
मनीषा दरेकर
साईनाथ रुग्णालय
सुलोचना कोळेकर
मंगल शरद दरेकर
पोखरकर रुग्णालय
लता करंडे
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासन, पोलीस, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू असून, गंभीर जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी पुढे अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.


