कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात २१ वर्षीय विद्यार्थिनी गायत्री रेळेकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती सांगली जिल्ह्यातील असून तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. वडिलांशी फोनवर बोलल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

कोल्हापूर: कोल्हापुरात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री रेळेकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील आहे. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.

गावावरून परतल्यावर उचललं टोकाचं 

पाऊल गावावरून परतल्यानंतर गायत्रीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललं. गायत्री रेळेकर ही विद्यार्थिनी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. गायत्रीने आत्महत्या का केली याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक आणि गायत्रीच्या मैत्रिणींचा विद्यापीठाच्या समोरील आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

वडिलांना केला शेवटचा फोन 

वडिलांना शेवटचा फोन केल्यानंतर गायत्रीने टोकाचे पाऊल उचललं होत. गायत्री रेळेकर ही विद्यापीठातीली मुलींच्या वसतिगृहातील रुम नंबर 54 मध्ये राहत होती. गायत्रीसोबत तिच्या दोन मैत्रिणी राहत होत्या. ती तीन दिवस घरी राहून वस्तिगृहत परतली होती. 11 ऑगस्ट रोजी सकाळी ती सांगलीवरून कोल्हापूरमध्ये पोहोचली. तिने शेवटचा फोन वडिलांना केला होता.

पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवलं 

पंख्याला गळफास घेऊन गायत्रीने जीवन संपवलं आहे. दुपारी गायत्रीच्या मैत्रिणी वसतिगृहात आल्या. मैत्रिणी दरवाजा वाजवत होत्या पण तो आतून लावला असल्यामुळं उघडता आला नाही. त्यानंतर मैत्रिणींनी कॉल लावला, त्यावर रिंग होत होती पण तो उचलला नाही. नंतर त्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांना गायत्रीने गळफास घेतल्यास दिसलं आणि त्यांनी हंबरडा फोडला. गायत्रीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह परिसर आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.