VLTD technology मुळे वाहनांचे रियल टाईम लोकेशन शोधून काढणे सोपे जाणार आहे. याचा महिला आणि लहान मुलांना मोठा फायदा होईल. वाहनातील पॅनिक बटण दाबल्यास लगेच मदत मिळेल.
Weather Alert: १५ सप्टेंबरला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी 'लाभार्थी टोळी'वर टीका केली असून, जातींमध्ये भांडण लावण्याचा आरोपही केला आहे.
Vishwas Patil: विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सातारा येथे होणाऱ्या या संमेलनाची अध्यक्षता ते करतील. 'पानिपत' या कादंबरीसह अनेक उत्कृष्ट साहित्यकृती त्यांनी मराठी साहित्याला दिल्या आहेत.
Charity Commissioner Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयात १७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी पास, पदवीधर आणि विधी विषयातील उमेदवारांसाठी ही भरती १२ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी केली असता नागरिकांनी त्यांच्यापुढे पाणी आणि रस्त्यांच्या समस्या मांडल्या. एका महिलेने तर त्यांना थेट आव्हान दिले की, वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल.
मान्सून परतीच्या वाटेवर असला तरी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तासात पश्चिम राजस्थानमधून मान्सून परतीची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Weather Alert : या वर्षाच्या उत्तरार्धात 'ला निना'ची स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे जागतिक हवामान प्रणालीमध्ये बदल होऊन भारतात नेहमीपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Puneri Paltan जयपूरच्या एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटनने तेलुगु टायटन्सवर ३९-३३ असा विजय मिळवून अव्वल स्थान गाठले. गौरव खत्री आणि विशाल भारद्वाज यांनी पुणेरी पलटनसाठी बचाव करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Weather Alert: महाराष्ट्रात १४ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ३२ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra