Charity Commissioner Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयात १७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी पास, पदवीधर आणि विधी विषयातील उमेदवारांसाठी ही भरती १२ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
Charity Commissioner Bharti 2025: सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयात एकूण 179 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती 10वी पास, पदवीधर, तसेच विधी विषयात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भरतीची मुख्य वैशिष्ट्ये:
एकूण पदसंख्या : 179
पदांची नावे :
विधी सहाय्यक – 3 पदे
उच्च श्रेणी लघुलेखक – 2 पदे
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक – 22 पदे
निरीक्षक – 121 पदे
वरिष्ठ लिपिक – 31 पदे
ही भरती धर्मादाय आयुक्तालयाच्या विविध विभागांमध्ये करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 03 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज कसा कराल?
अर्जाची पद्धत : पूर्णपणे ऑनलाइन
ऑनलाईन अर्जाची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग – ₹1000
मागासवर्गीय / अनाथ / EWS – ₹900
वयोमर्यादा :
किमान – 18 वर्षे
कमाल – 38 वर्षे
मागासवर्गीय, अनाथ आणि EWS उमेदवारांसाठी 5 वर्षांची सवलत
महत्त्वाचे : अर्ज केवळ अर्ज शुल्क भरल्यावरच ग्राह्य धरला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर मिळणारी PDF नक्की सेव्ह करून ठेवा.
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही पदांसाठी केवळ 10वी उत्तीर्ण, तर काहींसाठी पदवी किंवा विधी विषयातील पात्रता आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा.


