Monsoon Update: आज कोल्हापुरात जोरदार पाऊस पडणार, पुण्यात काय स्थिती राहणार?
मान्सून परतीच्या वाटेवर असला तरी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तासात पश्चिम राजस्थानमधून मान्सून परतीची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Monsoon Update: आज कोल्हापुरात जोरदार पाऊस पडणार, पुण्यात काय स्थिती राहणार?
मान्सून आता परतीच्या वाटेल लागला असून काही भागात पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार असून सांगली आणि पुण्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील.
पाऊस कुठं होणार?
मान्सून परतीच्या वाटेल लागला असून काही ठिकाणी आता चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासात पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज १४ सप्टेंबर रोजी कुठं पाऊस होईल ते जाणून घेऊयात.
पुणे जिल्ह्यात काय स्थिती राहणार?
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 28.4 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिला. वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील २ दिवसात कोल्हापूरला चांगला पाऊस होणार?
पुढील २ दिवस कोल्हापूरला चांगला पाऊस होणार आहे. मात्र पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचे असणार आहेत. कोल्हापूर सह कोल्हापूर घाटमाथ्यासह सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात पाऊस होणार का?
गेल्या २४ तासांमध्ये सांगली जिल्ह्यात ०.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच 28.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी विजांसह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.