- Home
- Maharashtra
- Weather Alert: महाराष्ट्रात सोमवारी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, मुंबई-पुण्यासह 35 जिल्ह्यांना अलर्ट
Weather Alert: महाराष्ट्रात सोमवारी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, मुंबई-पुण्यासह 35 जिल्ह्यांना अलर्ट
Weather Alert: १५ सप्टेंबरला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.

15 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
मुंबई: राज्यात 15 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तसेच तापमानातही चढ-उतार जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात, 15 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील?
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/ioRncjU3By— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 14, 2025
कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील ८ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
विदर्भातील अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तब्बल 35 जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यातील तब्बल 35 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाबरोबरच तापमानातही चढ-उतार जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची तर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वरील आर्टीकलचा मुळ अर्थ न बदलता शब्द आणि वाक्यरचना बदलून यापेक्षा आकर्षक आर्टीकल लिहून द्या. आणि त्या आर्टीकलला आकर्षक यूआरएल लिहून द्या.

