महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ₹20,000 कोटी मंजूर केले आहेत. यामुळे नागपूर-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने होणार आहे. इतर महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीतील वाढ आणि अनोळखी मतदारांच्या मतदानावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, निवडणूक आयोगानेही निवडणूक पारदर्शकपणे पार पडल्याचे म्हटले.
त्यानंतर मात्र ठाकरेंच्या एकिकरणाची चर्चा संपुष्टात आल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीसांनीच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या फुगा फोडला असल्याची चर्चा आहे.
Nashik Rain Update : जून महिन्यात नाशिकमध्ये विक्रमी 315 मिमी पावसाची नोंद झाली असून, गंगापूरसह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, गोदावरी नदीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा पूर आला आहे.
शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीआयपी दर्शनावर वेळेची मर्यादा घालून सर्वसामान्य भक्तांच्या सुविधेसाठी एक मोठं आणि सकारात्मक पाऊल उचललं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 'ब' वर्ग निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामुळे पवारांचे सहकारी क्षेत्रातील वर्चस्व अधोरेखित झाले असून, राजकीय वर्तुळात त्याचे दूरगामी परिणाम होतील असा अंदाज आहे.
पुणे शहरातील रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. तर भाजपा नेत्या मेधा कुलकर्णी यांनी स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल झाले असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकण आणि विदर्भातही पावसाची शक्यता आहे.
Thane Traffic Advisory : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहान वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत.
अदानी आणि टोरँट सारख्या खासगी कंपन्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाचे परवाने मागितल्याने, महावितरणसमोर आर्थिक आणि धोरणात्मक आव्हाने उभी राहिली आहेत. या स्पर्धेमुळे ग्राहकांना स्वस्त वीज मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra