नांदेड, लातूरसह मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ६ जूनपर्यंत या जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज सकाळी साधारण 6 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर विठ्ठलाचे दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता.
पुणे पोर्शे आघातप्रसंगी अनेक घटना समोर येताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवायचा नादात संपूर्ण अगरवाल कुटुंब तुरुंगात गेले आहे. या प्रकरणाचा तपास टप्पल १०० पोलिसांची टीम करत आहे.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारामती मधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
पॅलेस्टाईनचे समर्थन केल्यामुळे नागपुरातील एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
पुणे पोर्शे कार अपघातातील घटना रोज समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना आता अटक करण्यात आली असून ब्लड सॅम्पल प्रकरणात त्यांनी पैसे देऊन रिपोर्ट बदलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.