महिन्याभरापूर्वी जय पवार यांचा साखरपुडा झाल्यानंतर आता युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा पार पडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू आहे.

पवार कुटुंबातील तरुणांची लग्न होत आहेत. महिन्यापूर्वी जय पवार यांचा साखरपुडा झाला असून आता युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला असल्याचे त्यांनी पोस्ट करून सांगितलं आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रोहित पवार यांनी पोस्ट टाकली आहे.

पवार घराण्याच्या नवी सुनबाई 

पवार घराण्याच्या सुनबाई तनिष्का प्रभू असून त्यांचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तनिष्का यांचे शिक्षण परदेशात झाले. त्यांनी फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून सुप्रिया सुळे यांनी दोघांच्या साखरपुड्याची माहिती दिली आहे. तनिष्का या त्यांच्या दोघांच्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

View post on Instagram

सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती 

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली असून दोघांनी आयुष्यभर आनंदी राहा आणि एकत्र राहावं असं म्हटलं आहे. यंदाच्या वर्षी पवार कुटुंबातील दोघांनी साखरपुडा उरकून टाकला आहे. आत्याबाई सुप्रिया सुळे यांनी त्याची सर्वांच्या आधी माहिती दिली आहे. आता दोघे लग्न कधी करणार याबाबतचा सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.