भारतीय हवामान खात्याने 19 मेपर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मेपर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे.
कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
पुणे विमानतळावरील एअर इंडियाच्या एअरबसने टोईंग करणाऱ्या वाहनाला धडक दिली असून विमानातील प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्यात आले असून विमानाची तपासणी करण्यात येत आहे.
मनोज जरांगे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक आणि सभा घेत असताना आजारी पडले आहेत. त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
उबाठा नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे आणत असल्याचा आरोप करत ट्विट केले होते. यावर त्यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र यावेळी खबरदारी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची झाडाझडती घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता.
पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
पीएम मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं.