- Home
- Maharashtra
- Kolhapur News: नवरात्रीत कोल्हापूरला जायचंय?, या ट्रॅफिक नियमांची माहिती आधीच घ्या; नाहीतर होईल मोठा त्रास!
Kolhapur News: नवरात्रीत कोल्हापूरला जायचंय?, या ट्रॅफिक नियमांची माहिती आधीच घ्या; नाहीतर होईल मोठा त्रास!
Kolhapur News: नवरात्रोत्सवात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी विशेष ट्रॅफिक प्लॅन तयार केला. यानुसार शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी, बस-रिक्षा थांब्यांमध्ये बदल, विविध ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी आखला विशेष ट्रॅफिक प्लॅन
Kolhapur News: नवरात्रोत्सवात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक कोल्हापुरात दाखल होतात. यावेळी शहरात प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिसांनी विशेष ट्रॅफिक प्लॅन आखला आहे. ‘नो एंट्री’, बस-रिक्षा थांब्यांमध्ये बदल आणि भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अवजड वाहनांवर बंदी
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत शहराच्या प्रमुख चौकांमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. यामध्ये सीपीआर चौक, तोरस्कर चौक, गंगावेश, रंकाळा स्टँड, दसरा चौक आदी महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
केएमटी बस आणि रिक्षा सेवेत बदल
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील केएमटी बसथांबा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.बिंदू चौकातून येणाऱ्या बसेस आता आईसाहेब महाराज पुतळा आणि स्वयंभू गणपती मंदिर चौकातून मार्गक्रमण करतील.रिक्षाचालकांनी प्रवासी उतरवण्यासाठी आझाद गल्ली कॉर्नर किंवा माळकर तिकटी येथील पर्यायांचा वापर करावा.भवानी मंडप आणि माधुरी बेकरीजवळील रिक्षा थांबे पूर्णपणे बंद राहतील.
पार्किंगची व्यवस्था
भाविकांच्या सोयीसाठी शहरात पार्किंगची विशेष सोय केली आहे.
रात्रीचे पार्किंग (सायं. ६ ते १० वाजेपर्यंत): एमएलजी हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल, महाद्वार रोड, बिंदू चौक सबजेल उजवी बाजू, गुजरी दोन्ही बाजू, मराठी बँक परिसर, करवीर पंचायत समिती पटांगण.
व्हीआयपी पार्किंग: विद्यापीठ हायस्कूलसमोर विशेष राखीव व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणत्या मार्गाने कुठे पार्किंग?
पुणे–सातारा–सांगलीकडून येणारी गाड्या: तावडे हॉटेल, दसरा चौक, बिंदू चौक पार्किंग, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा.
कर्नाटक–कागलकडून येणाऱ्या गाड्या: सायबर चौक, माऊली पुतळा, गोखले कॉलेज मागील शिवाजी स्टेडियम, पेटाळा मैदान.
गारगोटी–कळंबा मार्गाने येणारी गाड्या: संभाजीनगर, नंगीवली चौक, लाड चौक, गांधी मैदान, ताराबाई हायस्कूल पटांगण.
राधानगरीकडून येणाऱ्या गाड्या: क्रशर चौक, लाड चौक, गांधी मैदान पार्किंग.
कोकण–गगनबावडा मार्गावरील गाड्या: रंकाळा व संध्यामठ परिसर.
शाहूवाडी मार्गे येणाऱ्या गाड्या: शिवाजी पूलमार्गे दसरा चौक किंवा बिंदू चौक पार्किंग.
हे नियम लक्षात ठेवले तर प्रवास होईल सुखाचा
नवरात्रीत देवीदर्शनासाठी कोल्हापूरला येताना जर हे नियम लक्षात ठेवले, तर आपलं प्रवास आणि दर्शन अधिक सोयीस्कर व सुरळीत होईल.

