सार
नवी मुंबईतील एका हॉटेलमधील शेफच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याचा विनभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Navi Mumbai : नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका 36 वर्षीय शेफच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याचा विनभंग करणे आणि तिचा पाठलाग करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
पीडित महिला (वय 26 वर्षे) चार महिन्यांआधी नवी मुंबईतील तुर्भे (Turbhe) येथील एका हॉटेलमध्ये कामाला लागली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी (23 जानेवारी) पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर हॉटेलमधील ज्युनिअर शेफच्या (Junior Chef) विरोधात कारवाई केली आहे.
पीडित महिलेने लावलेल्या आरोपात म्हटले आहे की, ज्युनिअर शेफने तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ज्युनिअर शेफचे पत्नीसोबत वाद असलयाचेही पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.
ज्युनिअर शेफने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. पीडित महिलेने एका राजकीय पक्षाच्या स्थानिक युनिटशी संपर्क साधत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 54 (महिलेच्या आत्मसन्माला ठेच पोहोचवण्याच्या उद्देशाने हल्ला), 354 D (पाठलाग करणे) आणि 506 (2) (गुन्हेगारी धमक्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील तपास केला जात असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा :
बोरिवलीत पतंगीच्या मांजाने घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियावरील पोस्ट Like करणे इंजिनिअर तरुणाला पडले महागात, गमावले 20 लाख रूपये
Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या