सार
Online Fraud in Pune : अलीकडल्या काळात ऑनलाइन माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे अधिक वाढू लागली आहेत. अशातच आता पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाला सोशल मीडियातील पोस्ट लाइक करणे महागात पडले आहे.
Online Fraud : वर्ष 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. नववर्ष सुरू झाल्यानंतर आताही पुणे (Pune) येथील एका इंजिनिअर तरुणाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या तरुणाच्या बँक खात्यातून 20 लाख रूपये काढण्यात आले. तरुणाची चूक ऐवढीच होती की, त्याने सोशल मीडियातील एका लिंकवर क्लिक केले होते.
रिपोर्टनुसार, पीडित इंजिनिअर तरुणाचे नाव अविनाश कृष्णनकुट्टी कुन्नुबारम आहे. अविनाश हा पेशाने इंजिनिअर आहे. अविनाशला एका अज्ञात क्रमांकावरून गेल्या वर्षात (2023) मार्च महिन्यात मेसेज आला होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, काही ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यानंतर त्याला अतिरिक्त पैशांची कमाई करता येईल.
अविनाशने मेसेजमधील लिंकवर क्लिक केले आणि काही टास्क पूर्ण केले. या टास्कचे पैसेही अविनाशला मिळाले. टास्क पूर्ण केल्यानंतर अविनाशला पैसे मिळू लागल्याने त्याचा विश्वास वाढला होता. पण अधिक काम करण्यासाठी अविनाशने पैशांची अधिक गुंतवणूक करण्यास सुरूवात केली.
अविनाशने पैसे गुंतवणूक टास्क पूर्ण करण्यासाठी एकूण 20.32 लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. पण पैशांची गुंतवणूक केल्यानंतर अविनाशला आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे कळले. अविनाशने गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण काही झाले नाही. यानंतर अविनाशने 3 जानेवारीला (2024) पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
ऑनलाइन फसवणूकीपासून असे रहा दूर
- कोणत्याही अज्ञात लिंक आणि ईमेल, मेसेज किंवा कॉलपासून दूर राहा.
- अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
- सुरक्षित वेबसाइटवरच व्यक्तिगत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. यावेळी URL "https://" पासून सुरू होतेय का हे पाहा.
- पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली पेमेंट करण्यासाठी सांगणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका. कोणतीही कंपनी नोकरी देण्यासाठी पैशांची मागणी करत नाही.
- तुमचे ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउजर आणि अँटीव्हायरल सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा.
आणखी वाचा :
मॉडेल दिव्या पाहुजा हत्येतील आरोपींना अटक, पण मृतदेहाचा शोध लागेना
Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या
Thane: नववर्षाआधी ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून 95 जणांना घेतले ताब्यात