Maharashtra Rain Update : मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान विभागाचा अंदाज खरा ठरू लागला आहे. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राताला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून सुरू मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशातच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबईत पावसाचा जोर कायम

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. महापालिकेची यंत्रणा सतर्क असून सखल भागांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीबाबत अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये 24 तासांत 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील 72 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. शहरावरील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to load tweet…

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघरला रेड अलर्ट; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.