खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका कार्यकर्त्यामधील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यात 'लाईनमन'च्या उल्लेखावरून वाद झाला. या घडामोडींदरम्यान, ओमराजे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जरी काही मतदार त्यांच्या पक्षबदलावर नाराज आहेत.

सध्या फुटीर खासदारांवरून एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याबद्दल संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये खासकरून ओमराजे निंबाळकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. ओमराजे यांचा एका कार्यकर्त्यासोबतचा हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला दिसून आला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रेकॉर्डिंगमध्ये काय आहे? 

या देण्यात आलेल्या रेकॉर्डिंगमध्ये कार्यकर्ता आणि ओमराजे या दोघांमधील संवाद आहे. कार्यकर्त्याने ओमराजे यांना तुम्ही खासदार म्हणून निवडून आले की लाईनमन असा प्रश्न विचारला आहे. त्यावर बोलताना ओमराजे यांनी मला लाईनमन म्हणून हिणवू नका असा कार्यकर्त्याला म्हटलं आहे. डीपीसाठी चकरा मारावा लागत असल्याचं यावेळी या कार्यकर्त्यान सांगितलं आहे.

ओमराजे लवकरच होणार मंत्री 

ओमराजे निंबाळकर यांच्यावर एकनाथ शिंदे हे मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे निंबाळकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. ओमराजे यांच्या मतदारसंघातील काही लोक मात्र त्यांच्या विरोधात असल्याचं दिसून आलं आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी ओमराजे यांनी पक्ष बदलल्याचा निर्णय आवडला नसल्याचं सांगितलं आहे.